भारतात घुसखाेरी करुन बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २५ पेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या ३५ पाेलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ल्यातला आराेपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समाेर आल्यामुळे ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. त्यासाठी बांधकामांची ठिकाणं आणि मजूर वस्तीत काेंबिंग ऑपरेशन केलं जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 20, 2025 3:41 PM | Bangladeshi | India