नवी मुंबई पोलिसांनी गेल्या ३० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशातल्या एका कुटुंबातील तीन सदस्यांना परवा अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला या तिघांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्यावेळी या तिघांनी काही कागदपत्रं सादर केली होती, त्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना सोडून देण्यात आलं होतं. मात्र तीन महिने या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ती बनावट असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना परवा अटक केली.
Site Admin | February 18, 2025 2:52 PM | Bangladeshi Family | Navi Mumbai Police
भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाला अटक
