मार्च 2020 पासून बेकायदेशीररीत्या देशात रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सातही जण गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतल्या चेंबूरच्या माहुल भागात रहात होते, त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. तसंच त्यांनी बांगलादेशी असल्याचं कबूल केलं आहे, अशी माहिती आरसीएफ पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली.
Site Admin | February 8, 2025 11:20 AM | Bangladeshi arrested
बेकायदेशीररीत्या रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक
