झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात आज बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया, त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयानं त्यांच्या पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा वाढवून ती दहा वर्षांची केली. ती सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. खालिदा यांना सूडभावनेनं या प्रकरणात गोवण्यात आल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
Site Admin | January 15, 2025 8:43 PM | Bangladesh SC