निवृत्तीनंतरचे विशेष लाभ मिळावेत आणि अन्य काही मागण्या करत बांग्लादेशातले रेल्वे कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ट्रेन चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांत झालेली बैठक निष्फळ ठरली.
देशातील रेल्वे वाहतूक बंद पडल्यानं नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी बांग्लादेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशननं विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत.