इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बांग्लादेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. बांग्लादेशाच्या हंगामी सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान सल्लागार सैय्यद रिजवाना यांनी काल बातमीदारांशी बोलताना याबाबत खुलासा केला. बांग्लादेशातल्या हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्णदास यांना एका विशेष आरोपांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरु असल्याचंही रिजवाना यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्यावरच्या आरोपांबाबत न्यायालय अंतिम निर्णय घेणार असल्याचंही रिजवाना म्हणाले.
Site Admin | November 29, 2024 2:45 PM | Bangladesh | ISKCON