बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज केला आणि आवाजी बॉम्ब फोडले. आपल्या नेत्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी त्यांचे अनुयायी चितगाव न्यायालयाच्या आवारात जमले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. अटकेनंतर त्यांच्या अनुयायांनी सुटकेची मागणी करत चिरागी पहाड परिसरात निषेध मोर्चा काढला.
Site Admin | November 26, 2024 7:51 PM | Bangladesh