बांगला देशात कोटा सुधारणा आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आणि यात चार जणांचा मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले. या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आज देशव्यापी बंद ची घोषणा केली होती आणि ढाक्यातले मुख्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो मार्गांची वाहतूक रोखली होती. बांगलादेशचे कायदा सुव्यवस्था आणि संसदीय कार्यमंत्री अनीसूल हक यांनी या आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेश सरकारनं पोलिसांच्या तुकड्यांसोबत सीमा सुरक्षा दलाच्या २२९ तुकड्या तैनात केल्या आहेत.
बांग्लादेशामधल्या भारतीय उच्चायुक्तालयानं भारतीय नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रवास टाळण्याचं वाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघानं बांगलादेश सरकारला या आंदोलक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.