बांगलादेशातल्या ‘बांगलादेश अन्सार’ या अर्थसैनिक सहाय्यक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सचिवालयातले सर्व कर्मचारी इमारतीत अडकून पडले आहेत. ‘बांगलादेश अन्सार’चं राष्ट्रीयीकरण करण्यात यावं या मागणीसाठी कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अनेक वर्षांपासून आपल्याबद्दल भेदभाव केला जात असून सरकारनं आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सचिवालयाची नाकेबंदी कायम राहणार असून कुणालाही बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा ‘बांगलादेश अन्सार’नं दिला आहे. बांगलादेशातलं आवामी लीगचं सरकार कोसळल्यानंतर या अर्धसैनिक दलाचं आंदोलन सुरू आहे.
Site Admin | August 25, 2024 8:19 PM | Bangladesh Ansar
‘बांगलादेश अन्सार’ दलाची केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी
