बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी निदर्शक, आंदोलक, पोलिस आणि सत्ताधारी पक्ष समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांदरम्यान काल झालेल्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. त्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांसह 90 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी काल राष्ट्रव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं असून, शेख हसीना सरकारच्या राजीनाम्याची मागणीचा आग्रह धरला आहे. सरकारनं काल ढाका आणि देशातल्या अन्य भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. सरकारनं आंदोलकांच्या सुरक्षिततेसाठी आजपासून तीन दिवस सार्वजनिक सुटीची घोषणा केली आहे. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली.
Site Admin | August 5, 2024 12:14 PM | aarakshan topic | banglade aarakshan | Bangladesh