बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं, जहिदुल इस्लाम उर्फ कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला कट रचणे, लुटणे आणि दारूगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये 57 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बांग्लादेशात साखळी स्फोट घडवून आणल्यानंतर या आरोपीनं भारतात घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालं. 2018 मध्ये बोधगयातला बॉम्बस्फोट आणि 2014 मधल्या बरद्वान बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा हात असल्याचं तसंच भारत आणि बांग्लादेशात जमात उल मुजाहिदीन यांच्याशी निगडीत कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला आहे. या प्रकरणांमध्ये एकंदर 11 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Site Admin | December 31, 2024 1:12 PM | Bangladesh