अहमदनगर जिल्ह्यातलं आदर्श गाव म्हणून प्रख्यात असलेल्या हिवरे बाजार इथल्या बनाभाई चांदभाई सय्यद यांचं आज वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. मुस्लीम धर्मीय असूनही ते पंढरपूर,आळंदी,देहू इत्यादी तीर्थक्षेत्राची नियमित वारी करत असत. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून संबोधलं जात होतं. सय्यद यांचे नातूही भजनात सक्रिय सहभाग घेत असतात. हिवरे बाजार ग्रामस्थांनी या कुटुंबियांसाठी लोकवर्गणीतून मशीद उभारली आहे. त्यामुळं मुस्लीम कुटुंबासाठी मशीद बांधणारं गाव म्हणून हिवरे बाजारचा लौकिक झाला आहे. सय्यद यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुन आणि नातवंडं असा परिवार आहे.
Site Admin | June 14, 2024 6:10 PM | अहमदनगर | बनाभाई चांदभाई सय्यद | हिवरे बाजार