डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी कायम

राज्यात माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पीठानं यासंबंधीचा अंतरिम आदेश आज जारी केला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची चोख अंमलबजावणी करण्याची सूचना न्यायालयानं राज्यातल्या स्थानिक यंत्रणांना दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा