मोठ्या प्रमाणात होणारं वायू प्रदूषम लक्षात घेता दिल्ली सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू असेल.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने हा आदेश जारी केला असून फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. हिवाळ्यात संभाव्य प्रदूषण लक्षात घेऊन ही बंदी घातल्याचं दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितलं. दिल्लीकरांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.