बालरंगभूमी परिषदेचं पहिलं बालरंगभूमी संमेलन २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. या संमलेनाच्या अध्यक्षपदी चित्रपट-नाट्य अभिनेते मोहन जोशी असतील, संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक-अभिनेते सुबोध भावे यांच्यासह नाट्य आणि बालनाट्य क्षेत्रातले ज्येष्ठ कलाकार या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बालकलाकारांची भव्य शोभायात्रा, विविध कलांचं, चित्ररथांचं प्रदर्शन, राज्यभरात गाजलेली बालनाट्यं, लोककलेचं सादरीकरण, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या बालकलावंतांचे कार्यक्रम यासह असंख्य विविध कार्यक्रम या संमेलनादरम्यान होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
Site Admin | December 7, 2024 5:23 PM | Balrangbhumi Sammelan