मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्णपणे भरला. गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज मध्य वैतरणा तलावही पूर्ण भरला आहे. गेल्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९पूर्णांक १० शतांश टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.
Site Admin | August 4, 2024 7:16 PM | पाणीपुरवठा | मध्य वैतरणा जलाशय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले
