बद्रिनाथ यात्रा काल सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित झाली. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर चामोली जिल्ह्यातील दोन ठिकाणी दरडींमुळे हा महामार्ग बंद झाला असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. पाताळगंगा बोगद्याच्या जवळ आणि जोशीमठाजवळ काल मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे यात्रा थांबवण्यात आली. पुढचे काही दिवसही उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी मोठा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Site Admin | July 11, 2024 11:46 AM | चामोली | पाताळगंगा | बद्रिनाथ