इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीने १६व्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी तैवानच्या सू या चिंग आणि चेन चेंग कुआन या जोडीचा ८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला दुहेरी प्रकारात अमृता प्रथमेश आणि सोनाली सिंग या भारतीय जोडीला मात्र थायलंडच्या ओर्निचा जोंगसाथापोर्नपार्न आणि सुकित्ता सुवाचाई या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. महिला एकेरी प्रकाराची ३२वी पेरी आज होणार असून भारताची पी. व्ही. सिंधू तैवानच्या सुंग शुओ-युनशी लढत देईल.
Site Admin | January 14, 2025 1:36 PM | Badminton Tournament
इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन : ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीचा १६व्या फेरीत प्रवेश
