डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन आज इंडोनेशिया मास्टर्स सुपर-500 मध्ये आपापले सामने खेळतील

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल.
पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जला कोरियाच्या जिओन ह्योक-जिन कडून २१-१२, २१-१० असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेनची लढत जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. हा सामना संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल. महिला दुहेरीत भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा