इंडिया ओपन २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या शुओ यून संग हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.
पुरुष एकेरीत बीडब्ल्यूएफ सुपर ७५९ स्पर्धेत किरन जॉर्जने युशी तनाका याला धूळ चारली.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपीला आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीनं यीन हुई सू आणि चेंग कुआन चेन यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारताच्या किदम्बी श्रीकांतने स्पर्धेतून माघार घेतली आहे.