क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला दक्षिण कोरियाच्या सेओ संग-जे आणि किम वोन-हो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कोरियन जोडीनं त्यांचा १०-२१, १५-२१ असा पराभव केला.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय जोडीनं मलेशियाच्या येव सिन ओंग आणि ई यी तेओ यांच्यावर २६-२४ आणि २१-१५ असा विजय मिळवला.