चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनलमध्ये ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीनं मलेशियाच्या परली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारतीय जोडीनं आज दुसऱ्या गटातील सामन्यात मलेशियाचा २१-१९, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी ट्रीसा आणि गायत्री यांची जोडी ही एकमेव जोडी आहे.