चीनमधल्या शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन तर महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांनी विजेतेपद पटकावलं.
अंतिम सामन्यात अँडर्स ॲंटनसन यानं इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्टीचा पराभव केला तर चिनीच्या फॅंग जी गाओ ला ॲनकडून पराभव पत्करावा लागला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीनं इंडोनेशियाचा पराभव केला तर महिलांच्या दुहेरीतही चीनची जोडी विजयी ठरली. मिश्र दुहेरीतही चीनच्या जोडीनं मलेशियाच्या प्रतिस्पर्धी जोडीला नमवत अजिंक्यपद पटकावले.