स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्यांनी स्वित्झर्लंडच्या ॲलाईन मुलर आणि नेदरलँड्सच्या केली व्हॅन बुइटेन या जोडीचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्रीचा सामना सेलिन हब्श आणि अमेली लेहमन या जर्मन जोडीशी होईल. महिला एकेरी प्रकारात आज संध्याकाळी भारताची पी. व्ही. सिंधू हिची लढत डेन्मार्कच्या ज्युली डावल जेकोबसेन हिच्याशी होईल, तर मालविका बनसोड हिचा सामना कॅनडाच्या मिशेल लीबरोबर होणार आहे.
Site Admin | March 19, 2025 1:40 PM | Badminton
Badminton : दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
