इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या काँग ही-योंग आणि किम हाय-जेओंग यांचा पराभव केला. आज त्यांचा सामना चीनच्या टॅन निंग आणि लिऊ शेंगशु या जोडीशी होईल. लक्ष्य सेन यानंही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं गतविजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत आता सेनची लढत चीनच्या ली शिफेंग याच्याशी होत आहे.
Site Admin | March 14, 2025 2:04 PM | Badminton
Badminton : भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
