भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रान्समधील ऑर्लियन्स इथं झालेल्या दोन्ही पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. श्रीकांतनं दोन सामन्यांमध्ये अनुक्रम मॅड्स क्रिस्टोफरसनचा आणि अर्नॉड मर्कलेचा असा पराभव केला. शंकर सुब्रमणियम यानेही मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत, तान्या हेमंतने तिचा पहिला सामना जिंकला पण दुसरा सामना गमावला. तिसऱ्या मानांकित आकर्शी कश्यपलाही पराभव पत्करावा लागला.
Site Admin | March 5, 2025 9:52 AM | Badminton
भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश
