डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 14, 2025 2:45 PM | Badminton

printer

बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात

आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूंनी चांगली लढत दिली मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचा जपानच्या हिरोकी मिदोरिकावा आणि नात्सु सैतो यांच्याकडून १३-२१, २१-१७, १३-२१ असा पराभव झाला.

 

महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिचाही टोमाका मियाझाकीविरुद्धच्या सामन्यात १२-२१, १९-२१ असा सरळ गेममध्ये पराभव झाला. पुरुष एकेरीत एच.एस प्रणॉय याने जपानच्या केंटा निशिमोतोविरुद्ध लढत दिली, मात्र त्याचाही या सामन्यात पराभव झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा