भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अग्रनामांकित पी. व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं जपानच्या मनामी सुझुझचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात सिंधूनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. सिंधूचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का तांजग बरोबर उद्या होणार आहे. महिलांच्या दुहेरी सामन्यात भारतीय जोडी तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचा जपानच्या जोडीनं पराभव केला.
पुरुषांच्या दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. महिला दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा यांना मात्र जपानी खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला.