इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने पहिल्या फेरीत भारताच्याच रक्षिता रामराज हिचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्या मालविका बनसोड आणि आकर्शी कश्यप तर पुरुष एकेरीत भारताचे प्रियांशू राजावत आणि एच. एस. प्रणॉय यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Site Admin | January 15, 2025 8:21 PM | Badminton