क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत एच. एस. प्रणॉय याने प्रवेश केला. त्यानं कॅनडाच्या ब्रायन यांग २१-१२, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. उपांत्यफेरीत त्याची लढत चीनच्या फेंग लीसोबत होणार आहे.
या स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन इओम यांचा २१-१३, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या अन्य एका भारतीय जोडीनेही मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज भारताच्याच अमृता प्रथमेश आणि अशित सूर्या यांचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला.
महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. तिने आज मलेशियाच्या जिन वेई गोह हिचा २१-१५, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला.