डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी  ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संबंधित शाळा आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि कार्यवाह तुषार आपटे या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेनं कर्जतमधून ताब्यात घेतलं. या दोघांचा अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यांना नंतर विशेष तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितलं.  या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल न केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकानं याप्रकरणी दोन आरोपपत्रं दाखल केली आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा