माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या सर्व २६ आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आत्तापर्यंत मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह एकूण २६ आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणी अद्याप पुढील तपास सुरु आहे. मकोका अंतर्गत पोलिसांसमोर दिलेली जबानी न्यायालयात ग्राह्य धरली जाते. तसंच या गुन्ह्याखाली अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळणं कठीण असतं. ६६ वर्षीय माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या महिन्याच्या १२ ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
Site Admin | November 30, 2024 7:43 PM | Baba Siddiqui Death Case | Maharashtra Police