दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली असून ती लवकरच लागू करण्यात येईल, असं ही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या पहिल्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगचे १४ अहवाल मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी भाजपाच्या रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सरकारमध्ये सामान्य प्रशासन, सेवा, वित्त, महसूल, महिला आणि बालविकास, आणि इतर खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.