मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी २०२४ या वर्षाकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तकं या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात येत्या ३१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तकं पाठवावीत, असं आवाहन मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.
मंडळाच्या कार्यालयात तसंच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.