७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ९३ जवानांना तसंच ११ शहीद जवांनाना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यात मेजर मनजित यांना किर्ती चक्र जाहीर झालं आहे. नाईक दिलावर खान यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र जाहीर झालं आहे.
मेजर आशीष दहिया, मेजर कुणाल, मेजर सतींदर धनकर, असिस्टंट कमांडंट एशेन थंग किकॉन, सुभेदार विकास तोमर, सुभेदार मोहन राम, हवालदार प्रकाश तमंग, फ्लाईट लेफ्टनंट अमनसिंह हंस, कॉर्पोरल दाबी संजय हिफाबाई एस्सा, डेप्युटी कमांडंट विक्रांत कुमार, इन्स्पेक्टर जेफ्री हमींगचुलो यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहेत. कॅप्टन दीपक सिंग, हवालदार रोहित कुमार आणि विजयन कुट्टी यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहेत.