डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण आज अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नवनियुक्त अध्‍यक्ष रविंद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुरस्‍काराचं हे ३४ वे वर्ष असून, यंदा जेष्‍ठ साहित्‍यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्मानित करण्‍यात आलं. कानपूर इथले समीर चव्हाण यांच्‍या ‘अखई ते जाले या ग्रंथाला उत्‍कृष्ट साहित्‍य कृतीचा पुरस्‍कार मिळाला. , हसन शेख पाटेवाडीकर यांना कलेच्‍या सेवेबद्दल पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्‍कार, तर नाटककार अभिनेता प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलं.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा