अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आज अहिल्यानगर इथं ही माहिती दिली. राधेशाम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य पुरस्कारांसाठी नागपूरचे डॉ.अशोक काळे, ठाण्याचे गितेश शिंदे, अमरावतीचे डॉ.संदीप राऊत, मुंबईचे डॉ.श्रीधर पवार, पुण्याचे डॉ.संजीव कुलकर्णी यांच्या पुस्तकांची निवड झाली आहे. गोव्याच्या प्रिया बापट, नाशिकचे सुनिल शेलार, लातूरचे डॉ.गोविंद काळे, यांच्या साहित्यकृतींनाही पुरस्कार देण्यात येणार आहे.
येत्या २२ डिसेंबरला तरवडी, इथं ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कांगो यांचे हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.