डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पॉला बाडोसाची उपांत्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पॉला बाडोसा हिनं जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या कोको गॉफला हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. तिनं कोको गॉफचा ७-५, ६-४ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसरा सामन्यात अग्रमानांकित अरीना साबालेंका हिच्यासमोर अनास्ताशिया पावलुचेंकोवा हिचं आव्हान असेल. 

दुसरीकडे पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह यानं अमेरिकेच्या टॉमी पॉलला ७-६, ७-६, २-६, ६-१  नमवत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात आज दुपारी स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविच यांच्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी अटीतटीची लढत रंगेल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा