डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आरिना साबालेंकाचा सामना थोड्याच वेळात होणार

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत  अव्वल मानांकित आरिना साबालेंका हिचा सामना अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिच्याशी थोड्याच वेळात होणार आहे. साबालेंकाने हा सामना जिंकला तर १९९९ नंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सलग तिनदा जिंकणारी ती पहिला महिला खेळाडू ठरेल. दुसरीकडे मॅडिसन कीजला सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली आहे. २०१७ मध्ये तिचा अमेरिकेच्याच सलोन स्टीफन्स हिच्याकडून पराभव झाला होता. 

 

पुरुष दुहेरीत ब्रिटनचा हेन्री पॅटन आणि फिनलंडचा हरी हेलिओवरा यांचा  सामना  इटलीच्या  सिमोन बोलेली आणि अंद्रिया वावसोरी यांच्याशी होणार आहे.  

 

पुरुष एकेरीत इटलीच्या जन्निक सिन्नर याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी उद्या होणार आहे. तर महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत लतवियाज जेलेना ऑस्टापेन्का आणि हसीह सू वेई यांचा सामना टेलर टाऊसन्ड आणि केतरीना सिनियाकोवा यांच्याशी उद्या होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा