डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलंडच्या इगा श्वियांतेकचा पराभव

पाचवेळची ग्रँडस्लॅम विजेती, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं अटीतटीच्या सामन्यात तिच्यावर ७-५, ६-१, ७-६ अशी मात केली. आता अंतिम फेरीत मॅडिसनचा सामना शनिवारी अग्रमानांकित अरीना सालाबेंका हिच्याशी होईल. सालाबेंका हिनं उपांत्य फेरीत स्पेनच्या पॉला बाडूसा हिचा ६-४, ६-२ असा सहज पराभव केला.

दरम्यान, पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने उद्या होणार आहेत. यात सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविच आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील, तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित, इटलीच्या यानिक सिनर याच्यासमोर अमेरिकेच्या बेन शेल्टनचं आव्हान असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा