ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित इटलीचा यानिक सिनर यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चौथ्या फेरीत त्यानं अटीतटीच्या सामन्यात डेन्मार्कच्या होल्गर रूने याच्यावर ६-३, ३-६, ६-३, ६-२ अशी मात केली. तर महिला एकेरीत सहाव्या मानांकित कझाकस्तानच्या एलेना रिबाकीना हिला पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं तिचा ६-३, १-६, ६-३ असा पराभव केला.
Site Admin | January 20, 2025 7:24 PM | Tennis
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिनरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
