ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कोलंबियाचा जोडीदार निकोलस बॅरिएंटोस या जोडीला पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ आणि जाऊमा मुनार या जोडीनं त्यांच्यावर ७-५, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात केली.
दरम्यान, उद्या ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली, एन. श्रीराम बालाजी आणि युकी भांब्री हे भारताचे टेनिसपटू उद्या दुहेरीच्या मैदानात उतरतील.