डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे. त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशी सहज मात केली. २ तास, ४२ मिनिटं चाललेल्या या सामन्यावर सिनरनं सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. त्याला एकाही ब्रेक पॉइंटचा सामना करावा लागला नाही. २३ वर्षीय यानिक सिनरचं ते तिसरं ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपद आहे. यापूर्वी त्यानं २०२४मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपनचं जेतेपद पटकावलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा