डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महिलांच्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथे झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटक आणि एका चेंडूत 215 धावांतच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 105 धावा केल्या. अरुंधती रेड्डीनं 4 बळी घेतले. तत्पूर्वी, ॲनाबेल सदरलँडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेलनं 95 चेंडूत 110 धावा केल्या.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा