महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत आठ गडी गमावून 151 धावा केल्या.
Site Admin | October 14, 2024 9:27 AM | Australia | Cricket
महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात
