डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 8, 2024 2:29 PM

printer

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० गडी राखून विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत १ – १ अशी बरोबरी साधली आहे.
आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव ५ बाद १२८ धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र दिवसाच्या पहिल्याच षटकात ऋषभ पंत माघारी परतला. त्यानंतरही भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा दुसरा डाव केवळ १७५ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं भारताचा निम्मा संघ बाद केला. भारताच्या वतीनं नितीश रेड्डी यानं सर्वाधिक ४२ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्यासमोर विजयासाठी केवळ १९ धावांचं आव्हान उरलं. ते ऑस्ट्रेलियानं कोणताही गडी न गमावता पूर्ण केलं. पहिल्या डावातला शतकवीर ट्रॅव्हिस हेड याला सामनाविराच्या किताबानं गौरवलं गेलं. मालिकेतला तिसरा सामना येत्या १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा