महिला क्रिकेटमधे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत, आज ब्रिस्ब्रेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३५ व्या षटकातच १०० धावा करुन गारद झाला. मेगन स्कट हिनं पाच बळी घेतले. तर किम गर्थ, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सुदरलँड आणि ऍलेना किंग यांनी प्रत्येकी एकबळी मिळवला.
ऑस्ट्रेलियानं सतराव्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. जॉर्जिया ओलच्या नाबाद ४६, आणि फिबी लिचफिल्डच्या ३५ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियानं विजय साकार केला. भारतातर्फे रेणुका सिंहनं तीन तर प्रिया मिश्रानं दोन गडी बाद केले.