कोळसा खाण मंत्रालयाने आज कोळसा खाण विकास आणि उत्पादन कराराअंतर्गत तीन कोळसा खाणींचा लिलाव केला. मच्छकाटा, कुडनली लुब्री आणि सखीगोपाळ बी काकुडी या तीन कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. एनएलसी इंडिया लिमिटेड, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी या खाणींसाठी बोली जिंकली. या तिन्ही खाणींमधून होणारं वार्षिक उत्पन्न सुमारे ३ हजार कोटी रुपये असून खाणकाम सुरू झाल्यानंतर ४० हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
Site Admin | July 15, 2024 8:14 PM