डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 28, 2025 8:42 PM | ATM | RBI

printer

ATM मधून पैसे काढणं महागणार !

एटीएममधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १ मेपासून दोन रुपयांनी वाढ करायची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिली आहे. सध्या हे शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये अशी आहे. बँका आता ती वाढवून २३ रुपयांपर्यंत नेऊ शकतात, असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा निःशुल्क व्यवहार करता येतात. तसंच इतर बँकांच्या एटीएममधून महानगरांमध्ये तीनदा, तर इतर शहरांमध्ये पाच वेळा कोणतंही शुल्क न देता पैसे काढता येतात.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा