डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑलिम्पिकच्या मैदानातले भारताचे शिलेदार

क्रीडाविश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या, पॅरिस इथं होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही आहे, हे जाणून घेण्यासाठी, की आपले शिलेदार नेमके कधी मैदानात उतरणार आहेत. या सगळ्या शिलेदारांची तोंडओळख आपण करून घेऊया. 

 

एकंदर ११७ क्रीडापटूंचा हा चमू यंदा भारतासाठी पदक मिळवण्यासाठी लढत देणार आहे. १६ विविध क्रीडाप्रकारांच्या ६९ उपप्रकारांमध्ये ९५ पदकांच्या शर्यतीत ते उतरतील. यात ७० पुरुष आणि ४७ महिलांचा समावेश आहे.

 

 

या चमूमध्ये महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. पुरुषांच्या २०० मीटर फ्रीस्टाइल धनुर्विद्या प्रकारात प्रवीण जाधव भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ॲथलेटिक्स प्रकारात पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे, उंच उडीत सर्वेश कुशारे पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील, तर बॅडमिंटनच्या कोर्टवर पुरुष दुहेरीत सात्विकसाईराजला महाराष्ट्राच्या चिराग शेट्टीची साथ मिळेल.

 

४४ वर्षीय टेनिसपटू रोहन बोपण्णा हा २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात जास्त वयाचा खेळाडू आहे.

 

 

तर, अवघ्या १४व्या वर्षी जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरलेली धिनिधी देसिंघू सगळ्यात कमी वयाची प्रतिनिधी आहे.

 

Image

 

  • ॲथलेटिक्स क्रीडाप्रकारात भारताचे २९ खेळाडू मैदानात उतरतील. यात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत.

 

 

या चमूत ॲथलेटिक्स प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या सगळ्यात जास्त, म्हणजे २९ इतकी आहे. त्याखालोखाल नेमबाजीत उतरलेल्या २१ खेळाडूंचा नंबर लागतो.

 

  • भारतानं ज्या खेळात आजपर्यंत विक्रमी कामगिरी केली, त्या हॉकी पुरुष संघाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले राहतील.

 

 

  • बॅडमिंटनमध्ये यंदा भारताचं प्रतिनिधित्व सात खेळाडू करणार आहेत. यात यापूर्वी कास्यपदकाला गवसणी घालणारी पी. व्ही. सिंधू आहेच. 

 

 

  • शिवाय सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेली सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडीही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

 

 

  • धनुर्विद्या स्पर्धेत यंदा विविध प्रकारांमध्ये सहा भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत.

 

  • नेमबाजी स्पर्धेत भारताचे अनुभवी आणि यशस्वी खेळाडू आपली जादू दाखवणार आहेत. यात मनू भाकर, ईशा सिंह, रिदम सांगवान, सिफ्त कौर समरा, अंजुम मौद्गिल, एलावेनिल वलरीवरन यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं राहील.

 

 

  • मुष्टियुद्ध स्पर्धेतला भारताचा सहा जणांचा चमूही बळकट आहे. यात निखत जरीन, लोव्हलीना बोर्गोहाइन, अमित पंघल या बहुचर्चित नावांकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

 

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी घालणारी भारोत्तोलक मीराबाई चानू यंदाही पदकासाठी मैदानात उतरेल.

 

 

  • टेनिसमध्ये भारताचा दिग्गज रोहन बोपण्णा याच्यासोबत एन. श्रीराम बालाजी आणि सुमित नागल हे दोघेही कोर्टवर उतरतील.

 

टेनिस, ओलंपिक 2024: रोहन बोपन्ना और श्रीराम बालाजी की अगुवाई में दौड़; सुमित  नागल मिट्टी पर दौड़ने के लिए तैयार

 

  • घोडेस्वारी स्पर्धेत अनुश अगरवाला एकहाती भारताचं प्रतिनिधित्व करेल.

 

 

  • गोल्फमध्ये चार खेळाडूंचा चमू पदकासाठी मैदानात उतरणार आहे.

 

  • ज्युदोमध्ये तुलिका मान, रोविंग स्पर्धेत बलराज पनवर, तर नौकानयनात विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमनन यांच्यावर भारताची भिस्त असेल.

 

  • जलतरण स्पर्धेत एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये एकंदर ८ जलतरणपटू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

  • कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाट, अंतिम पंघल यांच्यासह सहा खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

 

 

  • यंदा पहिल्यांदाच टेबल टेनिसमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला असा पूर्ण संघ भारताकडून मैदानात उतरणार आहे.

 

  • या सर्व खेळाडूंचे पदकांसाठीचे सामने उद्यापासून, म्हणजेच २७ जुलैपासून सुरू होतील आणि ११ ऑगस्टपर्यंत, म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत हा थरार आपल्याला अनुभवता येणार आहे.

 

या चमूतली काही नावं आपल्या परिचयाची आहेत, वेगवेगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या क्रीडापटूंचा यात समावेश आहे, तर काही नावं नवीन आहेत. आता हे सगळे खेळाडू आपलं क्रीडानैपुण्य कसं दाखवणार आणि देशासाठी पदक जिंकण्याचा, पोडियमवर उभं राहून देशाचा तिरंगा उंचावत जाताना अभिमानाने बघण्याचा मान किती जण पटकावणार, हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा